बिच्चारा नवरा

कांही म्हणा आम्हां नवर्‍यांचा जन्मच वाईट
मिडीयासारखा बायको घेते
येताजाता बाईट
लग्नाआधी बरी वाटायची,
साधी आणि भोळी
एका गजर्‍यात देखील हिची, खुलायची खळी
माझ्या आईला पाहूनही हिच्या
गाली पडायची खळी
निवड नाही चुकली आपली, वाटायच त्यावेळी,
पुढे चित्रच बदलेल सार
हे नव्हत मला माहित
आम्हां नवर्‍यांचा जन्मच वाईट
सप्तपदीपुरतीच माझ्या मागे मागे चालली,
नंतर कळलच नाही माझ्या पुढे हिने,
आघाडी कधी मारली?
चाळीशीनंतर तर ही झाली सोशल अणि फ्री
मी ऑफीसातू येतो,
तर ही नसतेच घरी,
माझ्या आईशी तर पुढे कधीच
वागली नाही बरी
हिच्या आईपासूनही धोका असतो,
हे नव्हत मला माहीत,
खरच आम्हां नवर्‍यांचा जन्मच वाईट
निवृत्तीनंतर वाटल, माझी दखल घ्यावी हिनी.
चहा घेत दूपारी दोघांनी,
मस्त टाकावी रमी
पण कसल काय हो………..
वर्षानुवर्ष ही जुन्या वाईनसारखी मुरली,
आता काय कप्पाळ बदलणार?
मला आशाच न उरली,
बायको म्हणजे अजब रसायन
हे फार उशीरा झाल हो माहीत,
साला आम्हां नवर्‍यांचा जन्मच वाईट,

— सौ. अलका वढावकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*